“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

नारायण नागबळी

Rudraksha
roll roll
narayan nagbali

नारायण नागबली पूजा हि दोन विविध पूजांचे एकत्रीकरण आहे, ज्यात नारायण बळी पूजा व नागबळी पूजा यांचा समावेश आहे. ह्या दोन्ही पूजा नारायण नागबळी पूजा म्हणून एकत्रितच केल्या जातात. याला कारण असे आहे कि आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीची मृत्यू कुठल्या कारणाने झाली आहे हे निश्चित माहिती नसते, त्यामुळे असे पूर्वज मृत्युलोकात भटकतात आणि परिणामी पितृदोष भोगावा लागतो. त्यामुळे ह्या क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे. हि पूजा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते, जिथे ब्रह्मा, विष्णू व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत.

नागबळी पुजा

nagbali puja

जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुर्मरण येते तेव्हा अशा व्यक्तीच्या आत्मशांती प्रित्यर्थ नारायण बळी पूजा करावी असा शास्त्रांमध्ये उल्लेख केला आहे. हि पूजा न केल्यास श्राद्ध केले तर ते अंतरिक्षात वाया जाते.


“ प्रेतोनोपतिष्ठति तत्सर्वमन्तरिक्षे विनश्यति |
नारायणबलिः कार्यो लोकगर्हाभिया खग”

- - गरुडपुराण, धर्मकाण्ड, अध्याय ४

श्लोकार्थ - दुर्मरण आल्याने मृत परिजनांना दिलेले श्राद्ध अंतरिक्षातच नष्ट होते. त्यासाठी प्रथम नारायण बळी पूजा करणे आवश्यक आहे.

एखाद्या व्यक्तीला दुर्मरण अनेक प्रकारे येऊ शकते, जसे:

 • वीज अंगावर पडली असेल .
 • डोंगरावरून अथवा पर्वतावरून पडल्याने.
 • अपघात झाले असल्यास.
 • पाण्यात बुडाल्याने.
 • झाडावरून किंवा उंचावरून पडल्यास.
 • प्राण्यांच्या हल्ल्याने.
 • आत्महत्या झाल्याने.
 • खून झाल्याने.
 • अग्नीने जळून मरण आले असेल.
 • शॉक लागून मरण आले असल्यास.
 • उपासमारीने मरण झाले असेल.
 • शापाने मरण आले असल्यास.
 • महामारी जसे कोरोना, कोलेरा (पटकी) मुळे मरण आले असल्यास.

नारायण नागबळी पूजा का करावी?

नागबळी पूजेचे अनुष्ठान नाग हत्येच्या पापातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नागाची हत्या करते अथवा त्यात सहभागी असते तेव्हा अशा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा अशा व्यक्तीने या पापातून निवारण करण्यासाठी नागबळी पूजा करावी.

नारायण नागबळी पूजा विधी:

nagbali puja

नारायण नागबळी पूजेला तीन दिवसांचा कालावधी लागतो. ज्यात पुढीलप्रमाणे धार्मिक क्रिया केल्या जातात.

 • श्राद्धकर्त्याला कुशावर्त तीर्थावर स्नान करून नवीन वस्त्रे धारण करावी लागतात.
 • पुरुषांनी धोती, कुर्ता तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी.
 • पुरुषाला एकट्याने हा विधी करता येतो परंतु स्त्रीला एकट्याने हा विधी करता येत नाही.
 • पूजेचा संकल्प घेऊन मग न्यास करावा. तदनंतर कलश स्थापन केले जाते.
 • कलश स्थापना करताना गुरुजी श्री विष्णु व यमाचे पूजन केले जाते.
 • विष्णु तर्पण तसेच प्राणप्रतिष्ठा, अग्निस्थापन, पुरुषसुक्त हवनादि करून श्राद्धकर्मे केली जातात.
 • पूजेच्या अंतिम दिवशी श्री गणेशांचे पूजन केले जाते आणि सर्व पूजा निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल आभार मानले जाते.
 • नागांच्या सुवर्ण प्रतिमांचे पूजन केले जाते.
 • गुरुजींना दान-दक्षिणा दिली जाते.
 • अंतिम विधी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन करून मग पूजेची सांगता होते.

नारायण नागबळी पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये का करावी?

नारायण नागबळी पूजा मंदिराच्या पूर्व दरवाज्याला असलेल्या अहिल्या गोदावरी मंदिर तसेच सतीचे महास्मशान इथे केली जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मा-विष्णु-महेश ह्या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप असलेले विशेष ज्योतिर्लिंग आहे.

“ तीर्थं त्रैयम्बकं नाम सर्वतीर्थ नमस्कृतम् |
यत्रास्ते भगवानीशः स्वयमेव त्रिलोचनः ।।
श्राद्धमेतेषु सर्वेषु कोटिकोटिगुणं भवेत् | स्मरणादपि पापानि नश्यन्ति शतधा द्विजः ”

- मत्स्यपुराण, अध्याय २२ (श्राद्धयोग्यतीर्थवर्णन)

श्लोकार्थ - सर्व तीर्थांपैकी त्र्यंबकेश्वर नामक तीर्थ हे तीर्थराज आहे, इथे साक्षात त्रिनेत्रधारी श्री शंकर उपस्थित आहेत. इथे श्राद्ध केल्याने कोट्यानुकोटी फळ देणारे आहे. या तीर्थाचे केवळ स्मरण केल्याने पापसमूहाचे शेकडो तुकडे होऊन नष्ट होते.

नारायण नागबळी पूजेचे फायदेः

 • उत्तम आरोग्य प्राप्त होते
 • पितृदोष नष्ट होतो
 • पितृदोषापासून उत्पन्न होणारे हानिकारक प्रभाव नष्ट होतात
 • संतती होण्यास प्रतिबंध दूर होतो
 • नाग स्वप्नात दिसणे बंद होते
 • कौटुंबिक समाधान लाभते
 • व्यवसायात आर्थिक वृद्धी होते
 • नोकरीत पदोन्नती होते

त्र्यंबकेश्वर पंडितजी


FAQ's

पूजेमध्ये होणाऱ्या सामग्रीचा खर्च यावर दक्षिणा अवलंबून आहे. पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींना दक्षिणा दिल्यावर पूजेची सांगता होते.
ह्या पुजसाठी तीन दिवसांचा कालावधी आवश्यक आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे अकस्मात निधन होते किंवा अपघाताने मृत्यू होतो अथवा सर्पदंशाने मृत्यू होतो, किंवा नागाची हत्या केली असल्यास अशा व्यक्तीला आणि नागाच्या मृतात्म्यास शांती लाभून नागहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी हि पूजा केली जाते.
अमावस्या, द्वादशी आणि पौर्णिमा असताना अथवा त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर हा विधी करता येतो.
हि पूजा करताना पुरुषांनी पांढरी धोती आणि कुर्ता, तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी, काळी साडी नेसू नये.
प्राचीन ग्रंथ धर्मसिंधु असे सांगते कि, नारायण नागबळी पूजा त्र्यंबकेश्वरलाच करावी, कारण इथे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि पतितपावनी गौतमी गंगा देखील आहे.
हि पूजा केल्याने घरातील दुर्मरण आलेल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते, तसेच सर्पहत्येचा दोष नष्ट होऊन अनिष्ट स्वप्न दिसणे बंद होते.
whatsapp icon