“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

त्र्यंबकेश्वर पूजा

Rudraksha
roll roll
nagbali puja

प्राचीन काळापासून श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मा-विष्णु-महेश ह्या त्रिमूर्तींचे सामूहिक ज्योतिर्लिंग आहे. मंदिर परिसरात तसेच त्र्यंबकेश्वर स्थित ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी अनेक पूजा केल्या जातात, जसे काळसर्प दोष शांती पूजा, नारायण नागबळी पूजा, महामृत्युंजय मंत्र जाप, त्रिपिंडी श्राद्ध पूजा, कुंभ विवाह, रुद्राभिषेक इत्यादी.

त्र्यंबकेश्वरमध्ये केल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण पूजांची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • कालसर्प योग शांती पूजा: जन्मपत्रिकेत राहू आणि केतूपासून दोष निर्माण होत असेल अशा वेळी ग्रहशांतीसाठी हि पूजा केली जाते.
  • नारायण नागबळी पूजा: पूर्वजांच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्ती लाभावी म्हणून नारायण नागबळी पूजा करण्यात येते.
  • त्रिपिंडी श्राद्ध पूजा मागील तीन पिढयांपैकी ज्या व्यक्तीचे श्राद्ध ३ वर्षे झाले नसेल, अशा पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी हि पूजा करण्यात येते.
  • कुंभ विवाह: जन्मपत्रिकेत मंगळीक दोष असल्यास लग्नाच्या वेळी किंवा लग्नानंतर जोडीदाराचा अकस्मात मृत्यू होण्याचा योग असतो तेव्हा हा दोष काढण्यासाठी कुंभ विवाह पूजा केली जाते. हे लग्न मातीच्या मडक्यासोबत (कुंभ) लावले जाते. ज्यामुळे हा योग टळतो आणि त्यानंतर वास्तविक लग्न करता येते.
  • अर्कविवाह: मंगळीक पुरुषाचे लग्न झाल्यास त्याच्या पत्नीचा मृत्यू होण्याचा संभव असतो. त्यामुळे अशा पुरुषाचे लग्न अर्क वृक्षासोबत (मंदार वृक्ष) लग्न लावले जाते, परिणामी मंगळ दोष नष्ट होतो. त्यानंतर अशा व्यक्तीला योग्य जोडीदाराशी लग्न करता येते.
  • रुद्राभिषेक: महादेवांना प्रसन्न करून जीवनात सुख-शांती-समाधान लाभावे, सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने रुद्राभिषेक केले जाते.
  • महामृत्युंजय जप: ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अकाली मरण, अल्पायु अथवा शापित योग असेल तेव्हा ते टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने महामृत्युंजय जप केला जातो.

वर निर्दिष्ट केलेल्या पूजा ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात तसेच वैदिक पद्धतीने ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी करणे श्रेयस्कर आहे, कारण फार पौराणिक काळापासून इथे सदर पूजा केल्या जातात. भाविकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पुरोहित संघाची स्थापना करण्यात आली आहे. पुरोहित संघाच्या ह्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांना सहजरित्या ताम्रपत्रधारी गुरुजींपर्यंत पोहचता येऊ शकेल. केवळ “ताम्रपत्रधारी” गुरुजींनाच त्र्यंबकेश्वर मंदिर आणि मंदिर परिसरात पूजेचा पूर्वापार अधिकार प्राप्त आहे, याची भाविकांनी दखल घ्यावी.

पुरोहित संघाने स्थानिक ताम्रपत्रधारी गुरुजींकडील ताम्रपत्र संरक्षित केले आहे त्याचप्रमाणे त्यांना नोंदणीकृत प्रमाणपत्र देखील दिले आहे. त्यामुळे भाविकांनी ह्या वेबसाईटच्या माध्यमातून पूजा-अनुष्ठान किंवा धार्मिक विधींबाबतीत आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींना संपर्क करावा.

आपण ह्या वेबसाईटमध्ये दिलेले पर्याय निवडून “त्र्यंबकेश्वर गुरुजी” ह्या विभागात जाऊन किंवा संबंधित पूजा विभागात जाऊन सर्व अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींची संपूर्ण माहिती व दूरध्वनी क्रमांक पाहू शकता आणि सविस्तर माहितीसाठी गुरुजींना संपर्क करू शकता.

whatsapp icon