“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

आमच्याविषयी

Rudraksha
roll roll

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर मधील पुरोहित संघाच्या अधिकृत वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.


त्र्यंबकेश्वर मधील पवित्र क्षेत्रात “पुरोहित संघ” आपले हार्दिक स्वागत करीत आहे. सर्व भक्त आणि प्रशंसकांना विविध सुविधा प्रदान करण्याच्या एकमात्र उद्देशाने पुरोहित संघ कार्यशील आहे.

नाव आणि स्वरूपात काळाच्या आवश्यकतेनुसार बदल करून हि संस्था मागील १२०० वर्षांपासून कार्यरत आहे. बदलत्या वेळेनुरूप संस्थेने भाविकांना अधिकाधिक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न दृढ केले आहेत.

सर्व अधिकृत पुरोहित, पुरोहित संघ संस्थेसाठी कार्यमग्न आहे तसेच ७०० वर्षे जुने शास्त्र, छत्रपती शिवाजी महाराज द्वारा प्राप्त लेख, हस्तलिखिते, धर्मग्रंथ तसेच अन्य क्षेत्रातील वैदिक, उद्योगपती तसेच प्रतिष्ठित व्यक्तींचे हस्तलेखासाठी एक विशेष सन्माननीय ओळख आहे.

पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर द्वारे सर्व भाविक आणि प्रशंसकांच्या सहाय्यतेसाठी हि वेबसाईट (www.purohitsangh.org) निर्मिली आहे. सर्व भाविक तसेच प्रशंसक “त्र्यंबकेश्वर गुरुजी” (https://www.purohitsangh.org/marathi/trimbakeshwar-guruji) विभागात अधिकारी ताम्रपत्रधारी गुरुजींची यादी पाहू शकता. सदर यादीत अधिकृत गुरुजींचे नाव, दूरध्वनी क्रमांक इत्यादी महत्वाची माहीती देण्यात आली आहे, ज्यामुळे आपण सहजरित्या पूजा-अनुष्ठान किंवा धार्मिक विधींसाठी गुरुजींना संपर्क करू शकता.

whatsapp icon