“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

त्रिपिंडी श्राद्ध

Rudraksha
roll roll
tripindi shraddha

जेव्हा एख्याद्या व्यक्तीच्या तीन पिढीतील पूर्वजांना दुर्मरण आले असेल अशा व्यक्तीच्या आत्मा शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध पूजा केली जाते.


त्रयाणामुदकं कार्य त्रिषु पिंडः प्रवर्तते चतुर्थः
सम्प्रदातैषां पंचमो नापि विद्यते

श्लोकार्थ - पिता, पितामह (आजोबा) आणि प्रपितामह (पंजोबा) यांना आम्ही श्राद्धाने प्रसन्न करतो. चवथा श्राद्धकर्ता स्वतः यजमान असल्याने पुढील पाचव्या व्यक्तीची संभावनाच नसते.

त्रिपिंडी श्राद्ध पूजा का केली जाते?

सहा घराण्यातील पितरांना सदगती मिळण्याकरिता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते

“ पितृवंशे मृतायच |
मातृवांशे तथैवच ||
गुरुश्वशुर बंधुनाम
येच्यान्ये बांधवास्मृता ।।”

श्लोकार्थ - पितृवंश, मातृवंश, गुरु, सासरे, सख्खा भाऊ, चुलत बंधू वरील सहा घराण्यांमध्ये दोष आढळले असता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते

  • एखाद्या व्यक्तीला अथवा कुटूंबाला जो आत्मा त्रास देत असेल त्यास अनादिष्ट गोत्र शब्दाने उच्चारले जाते कारण तो अज्ञात असतो अशा अनादिष्ट प्रेतांना शांती प्रदान करण्यासाठी हि पूजा केली जाते.
  • त्रिपिंडी श्राद्ध केल्याने सत्वगुणी पिशाच योनीतुन पूर्वजांना मुक्ती लाभते, हे पूर्वज वायूमंडलात भ्रमण करतात. (द्विविस्थ)
  • ह्या विधीने श्राद्ध केल्यास रजोगुणी पिशाच योनीतुन पूर्वजांना मुक्ती लाभते, हे पूर्वज अंतरिक्षात स्थित असतात. (अंतरिक्षस्थ)
  • त्रिपिंडी श्राद्ध विधीने तमोगुणी पिशाच योनीतुन पूर्वजांची सुटका होते, हे पूर्वज पृथ्वीवर वास करतात.(भूमिस्थ)
  • त्रिपिंडी श्राद्ध न केल्यास व्यक्तीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्रिपिंडी श्राद्ध पूजा केली जाते.

त्रिपिंडी श्राद्ध पूजा कुणी करावी?

  • घरातील व्यक्ती सतत आजारी असेल.
  • शिक्षणात पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत असतील.
  • विवाह जुळण्यात विलंब होत असल्यास.
  • पती पत्नीत नेहमी वादविवाद होत असेल.
  • संतती होण्यास अडचणी निर्माण होत असतील.
  • आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल.
  • मानसिक त्रास होत असेल.

त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी पात्रता काय आहे?

  • पती आणि पत्नी मिळून हि पूजा करू शकतात.
  • अविवाहित व्यक्ती किंवा विधवा देखील हि पूजा करू शकतात.
  • लग्न झाल्यावर स्त्री तिच्या माहेरील पूर्वजांसाठी हि पूजा करू शकत नाही परंतु सासरच्या पूर्वजांच्या शांतीसाठी हि पूजा करता येते.

त्रिपिंडी श्राद्ध पूजेची विधी काय आहे?

nagbali puja
  • प्रथम श्राद्धकर्ता कुशावर्त तीर्थावर स्नान करून त्रिपिंडी श्राद्धाचे संकल्प घेतो.
  • देव, ऋषी, दिव्यपितृ, स्वपितृ यांना नमन करून श्री महाविष्णुंचे स्मरण केले जाते.
  • अनुक्रमे यवपिंड (धर्मपिंड), व्रीहिपिंड आणि तिळपिंड पूर्वजांना दिले जाते.
  • तीनही पिंड दर्भांवर पसरवून त्यावर तिलोदक शिंपडावे.
  • पिंडांची पूजा करून अर्घ्य द्यावे.
  • श्री विष्णु मूर्तीचे अथवा शाळीग्रामाचे तर्पण केले जाते.
  • आलेल्या गुरुजींना भोजन देऊन दक्षिणा द्यावी.

त्रिपिंडी श्राद्ध पूजेपासून होणारे लाभ काय आहेत?

  • श्राद्धाने पित्र तृप्त होऊन श्राद्धकर्त्याला आशीर्वाद देतात.
  • श्राद्धकर्ता दीर्घायुषी होऊन तेजस्वी होतो.
  • श्राद्धकर्ता कर्तृत्वावान होतो.
  • आर्थिक संकट टळते.
  • नोकरीच्या ठिकाणी नावलौकिक होते.
  • व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक वृद्धी होते.
  • कौटुंबिक वादविवाद संपतात, सुख-शांती येते.
  • पती पत्नीतील सुसंवाद वाढतो.

त्रिपिंडी श्राद्ध पूजा त्र्यंबकेश्वर मध्येच का केली पाहिजे?

त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त तीर्थाचा महिमा पुराण तसेच धर्मशास्त्रामध्ये वर्णित केला आहे. इथे केलेले श्राद्धकर्मे, पूजा-अनुष्ठान यासारखी धार्मिक कार्ये त्वरित फलदायी होतात.

“ कुशावर्तमिति ख्यातं नराणां सर्वकामदम् |
कुशोनाऽऽवर्तितं यत्र गौतमेन महात्मना ||
कुशोनाऽऽवर्तयित्वा तु आनयामास तां मुनिः
तत्र स्नानं च दानं च पितॄणां तृप्तिदायकम्”

- ब्रह्म पुराण, अध्याय ८०

श्लोकार्थ - कुशावर्त म्हणून प्रसिद्ध तीर्थ हे भक्तांना सर्व इच्छित लाभ देणारे आहे. इथे गौतम ऋषींनी गोदावरी नदीला दर्भाने आवृत्त केले म्हणजे बांधले (अडविले) म्हणून ह्या पवित्र तीर्थावर केलेले स्नान, दान, तर्पणादि पितरांना पित्रांना शांती देणारे आहे.

इथे गौतम ऋषींनी तपश्चर्या करून गंगा नदीला भूतलावर आणण्यासाठी महादेवांना आवाहन केले होते, त्याची फलश्रुती म्हणून श्री महादेवांनी गंगा नदीला त्र्यंबकेश्वर मधील ब्रह्मगिरी पर्वतावर प्रकट केले. गौतम ऋषींवर प्रसन्न होऊन गंगा नदीने इथे कायमचे वास्तव्य करण्याचे ठरविले असताना, गौतम ऋषींच्या विनंतीवरून श्री महादेव स्वयं ब्रह्मदेव आणि विष्णुंसोबत इथे ज्योतिर्लिंग रूपाने वास करू लागले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून गंगा कुशावर्त तीर्थात जनमाणसांचा उद्धार करण्यासाठी पुन्हा प्रकट झाली त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये कुशावर्त तीर्थावर केली जाणारी त्रिपिंडी श्राद्ध पूजा त्वरित सफल होते.

त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी कुठला मुहूर्त योग्य आहे?

  • त्रिपिंडी श्राद्ध पूजा वैशाख, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, पुष्य, माघ आणि फाल्गुनमासात केली जाते.
  • हि पूजा अमावस्या असल्यावर केली जाते, विशेषकरून पितृपक्षात येणारी अमावास्या हि त्रिपिंडी श्राद्धासाठी उत्तम मानली जाते.
  • हि पूजा अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशीला देखील केली जाते.
  • जेव्हा सूर्य कन्या किंवा तूळ राशीत प्रवेश करतो अशावेळी हि पूजा केल्यास उत्तम लाभ प्राप्त होतात.
  • याशिवाय त्र्यंबकेश्वरमधील अधिकृत  ताम्रपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर दिलेल्या वेळेत हि पूजा करता येते.

त्र्यंबकेश्वर पंडितजी


FAQ's

हे एक योगदान आहे जे पैतृक आत्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना शांत करण्यासाठी केली जाते.
हि पूजा श्रावण, पौष, कार्तिक, फाल्गुन, वैशाख महिन्यातील पंचमी, अष्टमी, एकादशी, त्र्ययोदशी, चतुर्दशी आणि अमावास्येला करता येते.
हे एक अनुष्ठान आहे जे पितृदोषाने निर्मित झालेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सुचविले जाते.
हे अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो परंतु इतर पूजा ह्या पूजेसोबत केल्यास कालावधी वाढेल.
त्रिपिंडी श्राद्ध पूजा घरातील मुख्य कर्ता पुरुषाने केले पाहिजे. विवाहित किंवा अविवाहित दोनही व्यक्ती हे अनुष्ठान करू शकतात. परंतु स्त्रिया एकट्याने हे अनुष्ठान करू शकत नाही.
श्राद्ध समयी कांदा, लसूण, जिरा, काळे मीठ आणि डाळ अशा पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे.
तर्पण हि अशी विधी आहे ज्याद्वारे मृत पूर्वजांना भोजन, जल इत्यादि भोग प्रदान करून तृत्प केले जाते परिणामी त्यांना शांती लाभते आणि ते व्यक्तीला आशीर्वाद प्रदान करतात.
ह्या पूजेसाठी पुरुषांनी पांढरा कुर्ता व धोतीपरिधान करावा तर स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. स्त्रियांनी काळी साडी घालू नये.
ह्या पूजेची दक्षिणा हि पूजेसाठी लागणाऱ्या सामग्रीवर अवलंबुन आहे.
whatsapp icon