“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

महामृत्युंजय जाप

Rudraksha
roll roll
महामृत्युंजय जाप

कलियुगात सर्व संतांनी नामस्मरण हाच तरणोपाय सांगितला आहे, तेव्हा अगदी सहज प्रसन्न होणारी देवता असेल तर ती एकमात्र भोलेनाथ होय. भक्त त्यांना भोळा भंडारी देखील म्हणतात, कारण ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तेव्हा नामस्मरणाने सर्वात सहज प्रसन्न होणारे एकमात्र देव म्हणजे देवाधिदेव महादेव होय. त्यांनाच मृत्यूवर विजय प्राप्त केलेली देवता - महामृत्युंजय  असे म्हटले जाते. जेव्हा भक्तांच्या जीवनात जन्मपत्रिकेत अल्पायु असते किंवा अकाली मरण असते तेव्हा ते टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जाप करावे असे शास्त्रात निर्देश केले आहेत.

“ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनं ।
उर्वारुकमिव् बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्”

- ऋग्वेदः मण्डल ७ सूक्त ५९

श्लोकार्थ - हे त्रिनेत्रधारी परमेश्वरा, आम्हाला मृत्यूच्या पाशातून मुक्त करून शाश्वत जीवन प्रदान कर. ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी अलगद झाडावरून खाली पडते अगदी त्याप्रमाणेच आम्हाला या संसारातून मुक्त करून तुझ्या पावन चरणी अमरत्व प्राप्त व्हावे असा वरदान दे.

महामृत्युंजय मंत्राचा शब्दार्थ -

 • ॐ - सर्वशक्तिमान देवता
 • त्र्यंबकं - त्रिनेत्रधारी त्रिमूर्तीरूप (आहेत त्यांचे)
 • यजामहे - आम्ही यजन करतो म्हणजे पूजन करतो.
 • सुगन्धिम् - आमच्या जीवनात सुगंधी द्यावी म्हणजेच त्रासातून सुटका द्यावी.
 • पुष्टिवर्धनं - आम्हाला निरोगी जीवन देऊन त्यास पोषण द्यावे.
 • उर्वारुकमिव् - ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी झाडावरून अलगद खाली पडते.
 • बन्धनान्मृत्योर्मुक्षीय - त्याचप्रमाणे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून
 • मामृतात् - अमृतमय जीवन प्रदान करावे.

महामृत्युंजय जप कुणी केले पाहिजे?

महामृत्युंजय जाप
 • जन्मपत्रिकेत काळसर्प दोष योग असेल अशा वेळी महामृत्युंजय जप केले जाते.
 • घरात सतत कुणी व्यक्ती आजारी होत असेल.
 • जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अल्प आयु असेल.
 • वाईट रोगांपासून संरक्षण प्राप्त होण्यासाठी महामृत्युंजय जप केले जाते.
 • जेव्हा जन्मपत्रिकेत अकाली मरणाचा योग असेल.
 • अपघातांपासून संरक्षण तसेच श्रापातून सुटका हवी असेल.
 • जेव्हा जन्मपत्रिकेत पितृदोष असेल.
 • ज्योतिष शास्त्रानुसार जन्म, दशा, अंतर्दशा, स्थूलदशा इत्यादींमध्ये ग्रहदोष होण्याचा योग असेल अशा वेळी हा जप करणे आवश्यक आहे.
 • जन्मकुंडलीमध्ये ग्रहांमुळे दोष दिसत असेल तेव्हा याचे वाईट परिणाम दूर व्हावे यासाठी महामृत्युंजय जप केले जाते.
 • वारंवार आर्थिक नुकसान होत असेल.
 • लग्न जुळवताना पत्रिकेत षडाष्टक योग असेल.
 • जेव्हा मन धार्मिक कार्यातून परावृत्त होत असेल.
 • कुटुंबामधील लोकांमध्ये एकमत होत नसेल अथवा छोट्या कारणांवरून भांडणे उद्भवत असतील.

महामृत्युंजय जप केल्याने काय लाभ होतात?

 • हा जप केल्यास आध्यात्मिक उत्थान प्राप्त होते.
 • रोज नित्य क्रमाने हा जप केल्यास दुर्घटना टळते.
 • जीवनात कुठलेही कार्य सिद्ध होत नसेल तेव्हा जप केल्यास कार्यसिद्धी होऊन जीवनात सुलभता येते.
 • ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रह सुस्थितीत नसतील तेव्हा जप केल्यास सर्व दोष दूर होतात.
 • सर्व तऱ्हेची नकारात्मकता नष्ट होते.
 • महामृत्युंजय जप केल्याने त्यातून अनेक दिव्य अदृश्य लहरी प्रवाहित होतात ज्यात सर्व देवतांच्या शक्त्या असतात. ह्या शक्त्या शरीराभोवती एक कवच निर्माण करतात ज्यामुळे जपकर्त्याचे सर्व दुष्ट बाधांपासून रक्षण होते.
 • मनुष्य रोग मुक्त होतो.
 • जेव्हा मानसिक दडपण अथवा काल्पनिक भीती वाटत असेल तेव्हा महामृत्युंजय जप केल्यास त्वरित शांती लाभते.
 • जीवनातील आत्मविश्वास कमी होऊन नैराश्य येत असेल अशा वेळी महामृत्युंजय जप केल्याने अभिष्टसिद्धी प्राप्त होते.

महामृत्युंजय मंत्र जपाची काय पद्धती आहे?

 • जपकर्त्याने शुचिर्भूत होऊन शिवलिंगासमोर बसावे.
 • जप सुरु करण्यापूर्वी महादेवाचे स्मरण करावे.
 • प्राणायाम करून जपाचा संकल्प घ्यावा.
 • विनियोग, न्यास, करन्यास, अंग न्यास इत्यादी करून जपाला सुरुवात करावी.
 • गोमुखींत रुद्राक्षमाळेने जपाची सुरुवात करावी.
 • शिवलिंगावर अभिषेक करावा.

महामृत्युंजय मंत्र जप त्र्यंबकेश्वर मध्येच का केले पाहिजे?

महामृत्युंजय जाप

श्री ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिदेवांचे एकत्रीकरण असलेले एकमेव असे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. वास्तविक त्रिमूर्तीस्वरूप महादेव हेच भगवान महामृत्युंजय आहे. त्यामुळे इथे केलेले मंत्र जप, होम-हवन, यज्ञादि त्वरित लाभ देतात, असा भक्तांचा नित्य अनुभव आहे. म्हणूनच देश विदेशातून इथे अनेक भक्त मनोकामना सिद्ध करण्यासाठी येतात.

“तीर्थं त्रैयम्बकं नाम सर्वदेवनमस्कृतम् |
पूजयित्वा तत्र रुद्रं ज्योतिष्टोमफलं लभेत् ”

- ऋग्वेदः मण्कूर्मपुराण, उत्तरभाग, अध्याय ३५

श्लोकार्थ - तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ त्र्यंबकेश्वर नामक तीर्थ आहे ज्याला सर्व देवता आणि देवगण नमस्कार करतात. तिथे असलेल्या ज्योतिर्लिंगाचे पूजन करणाऱ्या भक्तांना ज्योतिष्टोम यज्ञाचे फळ प्राप्त होते.

याशिवाय गौतम ऋषींच्या तपस्येला प्रसन्न होऊन पतितपावनी गंगा इथे ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावली आहे. ह्या पवित्र गौतमी गंगेत भक्त स्नान केल्याने पापमुक्त होतात. त्यामुळे इथे केलेल्या सर्व पूजा अथवा विधी पूर्णत्वास येतात.

“मृत्युञ्जय महादेव त्राहि मां शरणागतम् |
जन्ममृत्युजरारोगैः पीडितं कर्मबन्धनैः ”

- श्री मार्कण्डेयपुराण, मार्कण्डेयकृत महामृत्युञ्जयस्तोत्र

श्लोकार्थ - मृत्युंजय महादेव आम्ही आपणास शरण आलो आहोत. हे प्रभु, कर्मबंधनात सापडल्यामुळे भोगत असलेल्या व्याधी, रोग, आजारातून आमची सुटका करावी.

स्मरणार्थ केलेले टिपण - सदर विधी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केल्यास अधिक लाभ होतो त्यामुळे जर शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र जप होत नसेल तरीही चिंता करण्याचे कारण नाही. त्र्यंबकेश्वर येथे अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींकडून श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासमोर भक्तांच्या वतीने महामृत्युंजय जप केला जातो. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या ताम्रपत्रधारी गुरुजींना संपर्क करावा.

त्र्यंबकेश्वर पंडितजी


FAQ's

महामृत्युंजय जप करण्यासाठी पहाटे ४ वाजता ब्रह्म मुहूर्त अधिक लाभदायक आहे. हा जप वैयक्तिक किंवा सामूहिकरीत्या कार्तिक अथवा श्रावण महिन्यात केल्यास उत्तम आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सोमवारी केल्यास विशेष लाभ देणारा आहे. समस्या गंभीर असल्यास ताम्रपत्रधारी गुरुजींकडून हा जप योग्य मुहूर्तावर केला जातो.
हा जप वैयक्तिक किंवा सामूहिकरीत्या करता येतो. वैयक्तिक जप केल्याने लाभ प्राप्त होण्यात अधिक कालावधी लागू शकतो परंतु, सामूहिकरीत्या हा जप केल्यास इच्छित लाभ त्वरित प्राप्त होतात.
सर्व ग्रहांमुळे आलेल्या दोषांचे निवारण करण्यासाठी तसेच जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय जप केला जातो.
सर्वसामान्यापणे महामृत्युंजय जपसाठी ७ ते ८ तासाचा अवधी लागतो.
ह्या जपसाठी पुरुषांनी पांढरी धोती व कुर्ता परिधान करावा तर स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. स्त्रियांनी काळी साडी घालू नये.
महामृत्युंजय जपसाठी आवश्यक असलेली सामग्री तसेच उपस्थित गुरुजींवर अवलंबुन आहे कि किती दक्षिणा आवश्यक आहे.
whatsapp icon