“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”
floral design
Rudraksha

कालसर्प दोष पूजा

Rudraksha
roll roll
kaalsarp dosh puja

कालसर्प दोष पूजा हि त्र्यंबकेश्वर क्षेत्रात स्थित ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी केली जाते. त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या विविध पूजांपैकी कालसर्प दोष योग पूजा हि महत्वाची पूजा आहे. वेदांचे अध्ययन केले असता असे आढळून येते कि राहुची अधिदेवता काळ आहे तर केतुची अधिदेवता सर्प आहे.

“ अग्रे वा चेत् पृष्ठतोऽप्रत्येकपार्श्वे भानाष्टकें राहुकेत्वोनखेट: |
योग प्रोक्ता सर्पश्च तस्मिन् जीतो जीत: व्यर्थ पुत्रर्ति पीयात्”

- व्यावहारिक ज्योतिषतत्वम

श्लोकार्थ - राहु आणि केतु यांमध्ये एका भागात जरी इतर सर्व ग्रह असतील तर कालसर्प नामक योग समजावा. हा योग घेऊन जन्मणाऱ्या व्यक्तीला धन आणि संतती असतील तरीही ते दुःखी असतात.

जन्मपत्रिकेत कालसर्प योग असलेल्या व्यक्तीस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यातून मुक्तता व्हावी या उद्देशाने या योगाची विधिवत शांती करणे आवश्यक आहे.

कालसर्प योगाचे प्रकार:

कालसर्प योग मध्ये जन्मलेल्या व्यक्तीमध्ये पुढीलपैकी एक प्रकार असतो :

  • अनंत कालसर्प योग : ज्या वेळी जन्मपत्रिकेत पहिल्या स्थानात राहु तर सातव्या स्थानात केतु ग्रह दिसून येतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतात तेव्हा त्यास “अनंत कालसर्प योग” म्हणतात.
  • कुलिक कालसर्प योग : जेव्हा जन्मपत्रिकेत दुसऱ्या स्थानात राहु तर आठव्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आलेले दिसतात तेव्हा त्यास “कुलिक कालसर्प योग” म्हटले जाते.
  • वासुकी कालसर्प योग : जन्मपत्रिकेत ज्या वेळी तिसऱ्या स्थानात राहु तर नवव्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये दिसतात तेव्हा त्यास “वासुकी कालसर्प योग” म्हणतात.
  • शंखपाल कालसर्प योग : ज्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत चौथ्या स्थानात राहु तर दहाव्या स्थानात केतु ग्रह दिसून येतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतात तेव्हा त्यास “शंखपाल कालसर्प योग” म्हटले जाते.
  • पद्म कालसर्प योग : जेव्हा जन्मपत्रिकेत पाचव्या स्थानात राहु तर अकराव्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आलेले दिसतात तेव्हा अशा योगास ज्योतिषशास्त्रात “पद्म कालसर्प योग” म्हटले जाते.
  • महापद्म कालसर्प योग : जन्मपत्रिकेत ज्या वेळी सहाव्या स्थानात राहु तर बाराव्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये दिसतात तेव्हा त्यास “महापद्म कालसर्प योग” म्हणतात.
  • तक्षक कालसर्प योग : जेव्हा जन्मपत्रिकेत सातव्या स्थानात राहु तर पहिल्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आलेले दिसतात तेव्हा त्यास “तक्षक कालसर्प योग” म्हटले जाते.
  • कर्कोटक कालसर्प योग : ज्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत आठव्या स्थानात राहु तर दुसऱ्या स्थानात केतु ग्रह दिसून येतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतात तेव्हा अशा योगास ज्योतिषशास्त्रात “कर्कोटक कालसर्प योग” म्हटले जाते.
  • शंखचूड कालसर्प योग : जेव्हा जन्मपत्रिकेत नवव्या स्थानात राहु तर तिसऱ्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आलेले दिसतात तेव्हा त्यास “शंखचूड कालसर्प योग” म्हणतात.
  • घातक कालसर्प योग : जन्मपत्रिकेत ज्या वेळी दहाव्या स्थानात राहु तर चौथ्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये दिसतात तेव्हा त्यास “घातक कालसर्प योग” म्हटले जाते.
  • विषधर कालसर्प योग : ज्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अकराव्या स्थानात राहु तर पाचव्या स्थानात केतु ग्रह दिसून येतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतात तेव्हा अशा योगास ज्योतिषशास्त्रात “विषधर कालसर्प योग” म्हटले जाते.
  • शेषनाग कालसर्प योग जेव्हा जन्मपत्रिकेत बाराव्या स्थानात राहु तर सहाव्या स्थानात केतु ग्रह असतात आणि इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये आलेले दिसतात तेव्हा त्यास “शेषनाग कालसर्प योग” म्हटले जाते.

कालसर्प दोष योग पूजा विधी:

कालसर्प योग शांती पूजेची विधी पुढीलप्रमाणे आहे.

  • कालसर्प योग शांती पूजा एकट्याने करता येते, परंतु गर्भवती महिला असल्यास एकट्याने हे पूजन करू नये.
  • याशिवाय जर ग्रस्तीत व्यक्ती बालक असेल तर त्यांचे पालक देखील हि पूजा जोडीने करू शकतात.
  • पवित्र कुशावर्त तीर्थावर स्नान करून, पूजेसाठी नवीन वस्त्रे परिधान करावीत.
  • पुरुषांसाठी धोती, कुर्ता तसेच स्त्रियांसाठी पांढरी साडी आवश्यक आहे.
  • प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे अत्यावश्यक आहे कारण ते सर्वपुजिताय सर्वप्रमुख देव आहेत.
  • कालसर्प योगाची शांती नागमंडल पूजन केल्यानेच सिद्ध होते. नागमंडल निर्माण करण्यासाठी द्वादश (१२) नागांच्या मूर्ती आवश्यक आहेत.
  • ह्या १२ नागमूर्तींपैकी दहा नागांच्या मूर्ती चांदीच्या असतात, एका नागाची मूर्ती सुवर्णाची असते तर एका नागाची मूर्ती तांब्याची असणे आवश्यक आहे.
  • सर्व नाग मूर्त्यांना एका मंडलच्या (चक्राच्या) आकारात अक्षदांवर ठेऊन नागमंडल तयार होते मग त्यावर लिंगतोभद्रमंडल निर्मिले जाते.
  • लिंगतोभद्रमंडल झाल्यास त्याची विधिवत् प्राणप्रतिष्ठा आणि षोडषोपचार पूजन केले जाते.
  • पूजन करीत असताना जन्मपत्रिकेनुसार असलेले कालसर्प दोषांची नाग मूर्तीचे विसर्जन केले जाते.
  • त्यानंतर राहु-केतु, सर्पमन्त्र, सर्पसूक्त, मनसा देवी मन्त्र, महामृत्युंजय मंत्राची एका माळ घेत मंत्रानी हवनादि केले जाते.
  • हवनादि झाल्यानंतर जन्मपत्रिकेत कालसर्प दोष दर्शविणारी प्रतिमा पत्रावळीत ठेऊन त्यावर दुधाने अभिषेक करावा.
  • आता ह्या पत्रावळीला पवित्र अशा जलाशयांत अथवा नदीमध्ये विसर्जित करावी.
  • तीर्थात स्नान करावे, पूजन केलेले वस्त्रे तिथेच सोडावी, सोबत आणलेली नवीन वस्त्रे धारण करावी.
  • विसर्जनानंतर सर्पाची तांब्याची मूर्ती ज्योतिर्लिंगास समर्पित करावे, सुवर्ण नागाची प्रतिमा मुख्य गुरुजींना देऊन दक्षिणा द्यावी.
  • इतर अन्य नागाच्या मूर्ती गुरुजींसोबत असलेल्या सहयोगींना दान देणे.
  • अंतिम विधी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन करून मग पूजेची सांगता होते.

कालसर्प योग शांती पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये का करावी?

त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग हे अतिप्राचीन असे त्रिमूर्तींचे एकत्रित असे एकमेव ज्योतिर्लिंग असल्याने भूत, भविष्य, वर्तमान बदलण्याची त्यात शक्ती आहे.

“ज्योतिर्लिंगं त्र्यंबकं हि पूजितं गौतमेन ह ।
सर्वकामप्रदं चात्र परत्र परमुक्तिदम्”

- शिवपुराण, कोटिरुद्रसंहितायां, अध्याय २६

श्लोकार्थ - त्र्यंबकेश्वर नामक हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग गौतमी गंगा नदीच्या तीरावर प्रकट झाले आहे, ज्यामुळे अनेकविध पातके नष्ट होतात.

nagbali puja

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा करण्याचा अधिकार ताम्रपत्रधारी गुरुजींना आहे. हा अधिकार वंशपरंपरेने चालत आला आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये विविध पूजा, शांतीकर्म करण्याचे अधिकार देखील गुरुजींकडे आहेत, त्यामुळे कालसर्प योग शांती पूजा हि ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी केली जाते.

कालसर्प योग शांती पूजेपासून होणारे लाभ:

  • नोकरीत नावलौकिक होऊन पदोन्नती प्राप्त होते.
  • व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होतात.
  • पती पत्नीमध्ये एकसंधता निर्माण होते.
  • मित्रांकडून नेहमी सहकार्य लाभते.
  • कौटुंबिक शांती लाभते.
  • आरोग्य स्थिर होते.
  • उत्तम संतती लाभते.
  • सामाजिक प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त होते.

त्र्यंबकेश्वर पंडितजी


FAQ's

ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत राहु आणि केतु निर्मित कालसर्प योग आला असेल अशा व्यक्तीने हि शांती पूजा करावी.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत असलेल्या राहु आणि केतु या ग्रहांच्या स्थानावर हे अवलंबून असते कि नेमका काय प्रभाव या योगामुळे होऊ शकतो.
कालसर्प योगाची शांती न केल्यास हा योग जातकाला निवारणा पर्यंत असतो असे शास्त्रानुसार म्हटले जाते.
ह्या पुजसाठी ३ तासांचा कालावधी आवश्यक आहे.
हि पूजा करताना पुरुषांनी पांढरी धोती आणि कुर्ता, तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी, काळी साडी नेसू नये.
हि पूजा पितृपक्ष अमावास्या, नागपंचमी, प्रत्येक महिन्यातील शिवरात्री, अथवा श्रावण सोमवारी केल्यास उत्तम आहे. याशिवाय ताम्रपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या शुभ मुहूर्तावर देखील हि पूजा केली जाते.
पूजेमध्ये होणाऱ्या सामग्रीचा खर्च यावर दक्षिणा अवलंबून आहे. पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींना दक्षिणा दिल्यावर पूजेची सांगता होते.
whatsapp icon