॥ पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर ॥
“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”

Narayan Nagbali Pooja Benefits in Marathi | नारायण नागबली पूजा फायदे

पितृ दोष म्हणजे नेमके काय? नारायण नागबली पूजा केल्याने हा दोष नाहीसा होतो का? हि पूजा त्रंबकेश्वर मध्ये कुठे केली जाते? नारायण नागबळी पूजा पितृदोष तसेच नाग हत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी केली जाते. नारायण नागबळी पूजा करण्याचा परंपरागत अधिकार त्र्यंबकेश्वर गुरुजींना आहे, ज्यांना तीर्थ पुरोहित देखील म्हटले जाते. हि पूजा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजा नजीक स्थित असलेल्या अहिल्या गोदावरी मंदिर व सतीचे महास्मशान इथे केली जाते. या पूजेत दोन पूजांचे एकत्रीकरण आहे, ज्यात नारायण बलिपूजा व नागबली पूजा समाविष्ट आहेत. आपल्या घराण्यातील पूर्वजांचा मृत्यू निश्चित माहीत नसल्याने ह्या दोन्ही पूजा एकत्रित केल्या जातात. 

नारायण नागबली पूजा करण्याचे फायदे

नारायण नागबली पूजा केल्याने आपल्या कुटुंबातील अतृप्त पित्रांना मुक्ती मिळण्यास सहकार्य होते. यातून आपल्याला पूर्वजांकडून आशीर्वाद प्राप्त होतो आणि परिणामी पितृदोष मिटतो. 

  • ज्या व्यक्तीच्या कुटुंबात पितृदोषाचा प्रादुर्भाव असतो अशी व्यक्ती खूप परिश्रम करून देखील मेहेनतीला योग्य न्याय मिळत नाही. पितृदोषामुळे आर्थिक प्रगती साध्य होत नाही. आर्थिक बचत कमी आणि खर्च जास्त झाल्याने मनस्ताप होतो. नारायण नागबली पूजा केल्याने पितृदोषातून सुटका होते, आर्थिक स्थिती सुधारते. 
  • ज्या कुटुंबामध्ये पितृदोष असतो तिथे कुठलेही व्यवसाय यशस्वी होत नाही. ज्यामुळे आर्थिक कोंडमारा होतो. यावर मात करण्यासाठी नारायण नागबली पूजा करणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक भरभराट होते, कर्ज मिटते, आर्थिक स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त होते. 
  • ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत पितृदोष असतो अशा व्यक्तीला संतती सुख नसते किंवा अल्प असते. अशा वेळी नारायण नागबली पूजा केल्याने पितृ दोषातून सुटका मिळते, पित्रांना शांती लाभते ज्यामुळे संततीची प्राप्ती देखील होते. नागदोष देखील जातो, ज्यामुळे संतती उत्तम आरोग्य घेऊन जन्माला येते.
  • ज्या घराण्यात पितृ दोष असतो तिथे दर रोज भांडणे, कलह होत असतात. ही भांडणे इतक्या पराकोटीला जातात कि कौटुंबिक हिंसा देखील होऊ शकते. अगदी क्षुल्लक वाद हिंसेचे रूप धारण करते. हे पितृ दोषामुळे होते. नारायण नागबली पूजा केल्याने पितृदोष दूर होऊन परिवारातील कलह मिटतात. 
  • पितृ दोषामुळे भाऊबंदकी, भांडणे, खुनशीपणा, मान-सन्मान तसेच संपत्ती जमवण्याची स्पर्धा सुरु असते. त्यात भर म्हणजे जर घरातील कुणा पूर्वजाकडून नाग हत्या झाली असेल तर त्या नागाचा आत्मा जागेवर भटकत असतो आणि स्वप्नात येऊन त्रास देतो, ज्यामुळे जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प होतात. अशावेळी नारायण बली पूजा केल्याने पितृदोष निवारण होते तसेच नागबली पूजा केल्याने नागाच्या आत्म्याला शांती लाभून जमिनीसंबंधी अडकलेले व्यवहार पूर्ण होतात.
  • ज्या परिवारातील पूर्वजांची आकस्मिक मृत्यू झाली असेल अशा पूर्वजांची विधिवत श्राद्ध पूजा केली पाहिजे. अन्यथा घरातील एखाद्या सदस्याचा अकाली मृत्यू होण्याची संभावना असते. नारायण नागबली पूजा केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभून आकस्मिक मृत्यू टळतो. तसेच व्यक्ती दीर्घायु होतो.
  • ज्या व्यक्तीला पितृदोषाची बाधा असते, त्या व्यक्तीने आपल्या पूर्वजांची शास्त्रानुसार श्राद्धादि विधी केले नसतील तर त्या व्यक्तीच्या स्वप्नात पूर्वज येऊन अन्न तसेच पाणी मागतात. त्याचप्रमाणे नाग स्वप्नात येऊन पाठलाग करीत असल्याचे दिसते ज्यामुळे व्यक्ती अधिकच घाबरते. नारायण नागबली पूजा केल्याने पित्रांना मुक्ती लाभते तसेच वाईट स्वप्ने दिसणे बंद होऊन मनातील भीती देखील नष्ट होते. 
  • ज्या कुटुंबात गृहलक्ष्मी आनंदी असते तिथे श्री, संपत्ती, समाधान आणि शांती नांदते. परंतु अशी काही कुटुंबे असतात जिथे पितृदोष मोठ्या प्रमाणावर असतो. अशा कुटुंबात स्त्री सुखी राहू शकत नाही. कुटुंबात होणारे सततची भांडणे, ताणतणाव इत्यादींमुळे ती खिन्न होते. अशा स्त्रीला सतत असुरक्षित वाटते, ज्यामुळे भीती निर्माण होते. शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जाणाऱ्या नारायण नागबली पूजेमुळे घरातील पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते परिणामी घरातील शांती पुन्हा प्रस्थापित होते. 
  • नारायण नागबली पूजा केल्याने कुटुंबातील नवजात बालकाला म्हणजे येणाऱ्या पिढीला पितृदोषाची बाधा होत नाही. 

नारायण नागबली पूजेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही पुरोहित संघ वेबसाइटला भेट देऊ शकता. पूजेचा विधी, मुहूर्त व त्रिंबकेश्वर मंदिरामध्ये पूजा करणाऱ्या गुरुजींची माहिती वेबसाइटवर दिलेली आहे. 

Available Panditji

View All

© 2026 Purohit Sangh. All Rights Reserved. Privacy Policy. Website by AIGS