॥ पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर ॥
“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”

Kaal Sarp Puja Benefits in Marathi | कालसर्प दोष पूजा फायदे

ह्या ब्लॉगमधे आपण काल सर्प दोष पूजा फायदे या बद्दल माहिती घेणार आहोत. कालसर्प दोष/योग म्हणजे नक्की काय? कालसर्प हा जन्मपत्रिकेत आढळणारा योग आहे, ज्यात जन्माच्या वेळी राहु आणि केतू समोरासमोर येऊन बाकी इतर ग्रह या दोहोंच्या मध्ये येतात. अशा परिस्थितीत व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे याला दोष असेही म्हटले जाते. कालसर्प योगाची विधिवत शांती केल्याने उत्तम लाभ मिळतात. पितृ दोष निवारण करण्यासाठी त्र्यंबकेश्वर (नाशिक) मध्ये कालसर्प योग शांती पूजा पुरोहित संघ गुरुजींच्या निवासस्थानी करण्यात येते, ज्यामुळे कालसर्प योगाचा नकारात्मक प्रभाव समूळ नष्ट होतो. कालसर्प योग शांती पूजेमुळे व्यक्तिला ग्रहांची उत्तम साथ लाभते आणि सर्व ग्रह दोष मिटतात. 

कालसर्प दोष पूजा फायदे

कालसर्प योग दोष पूजा झाल्यावर राहु आणि केतु ग्रह चांगल्या स्थितीत आल्याने अशा व्यक्तीला कालसर्प योगाचे शुभ फळ प्राप्त होतात, जे पुढीलप्रमाणे आहेत 

  • ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत राहु आणि चंद्र ग्रह चांगल्या स्थितीत असतील अशी व्यक्ति पूजेनंतर प्रोफेसर, वैज्ञानिक किंवा विद्वान होऊन लौकिकतेला प्राप्त होतात. अशा परिस्थितीत जर राहु आणि चंद्राची युति पहिल्या, चौथ्या, दहाव्या स्थानात किंवा त्रिकोण मध्ये होत असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धीने युक्त असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध होतात. 
  • कालसर्प योग शांति पूजा झाल्यावर जर व्यक्ती मेष, वृश्चिक किंवा मकर राशित आणि मंगळ जन्मपत्रिकेत पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानात असेल तेव्हा रुचक योग पूर्ण लाभ देतो. अशी व्यक्ती वायुसेना, नौसेना, मिलिटरी, पोलीस दल तसेच अन्य साहसिक कार्यांमध्ये उच्च पदाची प्राप्ती करते. 
  • जेव्हा व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत काळसर्पाच्या मुखात बुध ग्रह विद्यमान असतो तेव्हा शांती पूजा झाल्यावर अशी व्यक्ती उच्च शिक्षण प्राप्त करते. तेव्हा अशी व्यक्ती वनात प्रगतीची नवनवीन शिखर गाठते. बुधादित्य योग प्रस्थापित झाल्यामुळे हे संभव होते. 
  • कालसर्प योग असतांना स्वराशीत किंवा उच्च राशीत गुरु असल्यास राहुसोबत गजकेसरी योग पूर्ण लाभ देतो. कालसर्प योग शांती पूजेनंतर राहु सहाव्या स्थानी असेल आणि ब्रहस्पती केंद्र किंवा दहाव्या स्थानी असेल तेव्हा व्यक्तीला जीवनावश्यक धन-धान्याची बिलकुल कमतरता भासत नाही. 
  • कालसर्प योग शांती पूजा झाल्यावर जर काळसर्पाच्या मुखात शुक्र ग्रह शुभ स्थितीत असेल, तेव्हा त्या व्यक्तीला वैवाहिक जीवनात आनंदाची प्राप्ती होते. जेव्हा शुक्र दुसऱ्या किंवा बाराव्या स्थानी विद्यमान असेल तेव्हा अशी त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मालव्य योग निर्माण होऊन जेव्हा शुक्र स्वराशीत असेल किंवा उच्च राशीत केंद्रस्थानी स्थित असेल तेव्हा अशा व्यक्तीला मनपसंत जीवनसाथी प्राप्त होतो आणि विवाहानंतर उत्तम संतती प्राप्त होते.
  • कालसर्प योग शांति पूजा केलेली व्यक्ती तूळ, मकर किंवा कुंभ राशीची असेल आणि शनि जन्मपत्रिकेत पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानी असेल तेव्हा शश योग पूर्ण लाभ देतो तसेच अशा व्यक्तीला दीर्घायु प्राप्त होते. दीर्घायु सोबतच उत्तम आरोग्याची प्राप्ती झाल्याने व्यक्ती आपल्या पूर्ण आयुष्याचा भोग आनंदाने भोगते. शश योग निर्माण झाल्याने अशी व्यक्ती न्यायाधीश, वकील किंवा अभियंता सारखी उच्च पदस्थ अधिकारी होते.   
  • कालसर्प योग शांति पूजा सफल झाल्यावर ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत राहु ग्रह मिथुन किंवा कन्या राशीत विद्यमान असेल तसेच बुध, शुक्र, शनि सारखे मित्र ग्रह सोबत असतील अशी व्यक्तीच्या जीवनात संघर्ष कमी होऊन कार्ये पूर्णत्वास येतात.
  • कालसर्प योग शांति पूजा झाल्यावर ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत केतु ग्रह मीन किंवा धनु राशीत विद्यमान असेल तेव्हा शुक्र आणि राहु सारखे मित्र ग्रह सोबत असतील तेव्हा अशा व्यक्तीला समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.  
  • कालसर्प योग शांती पूजा झालेल्या व्यक्तीच्या जन्मांकात राहु १, २, ३, १० किंवा १२ व्या स्थानी असतो त्यांना विशेष फळ प्राप्त होते. अशा व्यक्तीच्या आरोग्यासंबंधी असलेल्या सर्व अडचणी दूर होऊन उत्तम स्वास्थ प्राप्त होते. सामाजिक आणि राजनैतिक क्षेत्रात उच्च स्थिती प्राप्त होते.

-------------------------------------------------------------------------------------------------------

पुरोहित संघ वेबसाइटच्या मदतीने तुम्ही सर्व प्रकारच्या पुजेचे गुरूजी ऑनलाइन बुक करू शकता. तसेच कालसर्प पूजा विधि, मुहूर्त व पूजा दक्षिणा यांची देखील महिती वेबसाइटवर दिली आहे.

त्रिम्बकेश्वर गुरूजी ऑनलाइन पूजा बुकिंग 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Available Panditji

View All

© 2026 Purohit Sangh. All Rights Reserved. Privacy Policy. Website by AIGS