॥ पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर ॥
“वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः”

रुद्राभिषेक पूजा म्हणजे काय? व रुद्राभिषेक पूजा करण्याचे फायदे

रुद्राभिषेक पूजा करणे म्हणजेच भगवान शंकरांच्या रुद्रावताराचे पूजन करणे होय. रुद्राभिषेक पूजा हि भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केली जाणारी अत्यंत महत्वाची पूजा आहे. भोलेनाथ आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी रुद्र रूपाने अवतार घेतात. त्यामुळे भक्त आपले रक्षण व्हावे आणि मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी रुद्रावताराचे अभिषेकाने पूजन करतात.

रुद्राभिषेक करताना वेदांमधील रुद्र मंत्राचे उच्चारण करून शिवलिंगावर अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाचे अनन्यसाधारण महत्व असल्याने याला अध्यात्मिक परंपरेचे रूप आले आहे. रुद्राभिषेक पूजन विधि वेदांमध्ये वर्णिली आहे, ज्यात एकादशीणी, लघुरुद्र, महारुद्र, आणि अतिरुद्र पाठ समावेश आहेत.

रुद्राभिषेक पूजन सामग्री एकूण ११ प्रकारची असते, त्यापैकी प्रामुख्याने ५ प्रकारची सामग्री वापरली जाते, ज्यात दूध, दही, तूप, मध, साखर (पंचामृत) यांचा समावेश होतो. त्र्यंबकेश्वर मध्ये वेदशास्त्र संपन्न ताम्रपत्रधारी गुरुजींद्वारे शिवसुक्त मंत्रोच्चाराने गंगाजल घेऊन शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. त्यानंतर संपूर्ण रुद्राभिषेक मंत्र उच्चारण केले जाते, ज्याचा उल्लेख शुक्ल यजुर्वेदातील रुद्रपाठ म्हणजेच रुद्राष्टाध्यायी पाठात आहे, रुद्राभिषेक मंत्र पंचामृताने रुद्राभिषेक करतांना जाप केला जातो. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, शिवप्रदोष या पवित्र दिवशी रुद्राभिषेक करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जागृत देवस्थानावर योग्य मुहूर्तावर वर्षभर रुद्राभिषेक केले जाते.

रुद्राभिषेक पूजा करण्याचे फायदे:

१) कुटुंबात होणारे क्लेश, भांडणे तसेच वादविवाद यातून सुटका करण्यासाठी रुद्राभिषेक केल्याने लाभ होतो. 

२) जो व्यक्ती कालसर्प योगाने ग्रासलेला आहे, त्याने रुद्राभिषेक मंत्र जाप करीत रुद्राभिषेक करावा ज्यामुळे फायदा होतो.

३) उसाच्या रसाने शिवरुद्राभिषेक केल्यास धन-संपत्तीमध्ये वृद्धी होते. 

४) जी व्यक्ती असाध्य रोगाने ग्रसित असते, त्याने कुश दर्भाने रुद्राभिषेक केल्यास लाभ होतो.

५) जेव्हा तुम्हाला नौकरी हवी असेल किंवा गुप्त शत्रूंची समस्या असेल तेव्हा मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक केल्यास समाधान लाभेल.

६) सुंदर, विद्वान आणि संस्कारी संतती हवे असेल तेव्हा दुधाने रुद्राभिषेक केल्यास फलप्राप्ती होते.

७) ज्वर नाश करावयाचे असल्यास गंगाजल घेऊन रुद्र मंत्राने जलाभिषेक केल्यास लाभ होतो.

८) ज्या वर्षी पाऊस होत नसेल तेव्हा गंगाजलाने अभिषेक करून रुद्राभिषेक मंत्राचा जाप केल्याने फायदा होतो.

९) जेव्हा प्रमेह रोगाची बाधा झाली असेल तेव्हा दुधाने रुद्राभिषेक केल्यास बाधा दूर होते.

१०) जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असते, तेव्हा पवित्र जलामध्ये साखर मिश्रित करून रुद्र मंत्राचा जप करीत रुद्राभिषेक केल्यास लाभ होतो. 

११) जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती हवी असते, अशा वेळी पवित्र तीर्थाचे जल आणून मग रुद्र मंत्रांनी रुद्राभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते.

१२) कुठल्याही रोगापासून मुक्ती हवी असेल तेव्हा पवित्र गंगाजलमध्ये खस इत्र प्रयोग केल्यास फायदा होतो.  

१३) जेव्हा व्यक्तीला घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा होत असेल तेव्हा त्यासाठी रुद्राभिषेक साठी दही वापरावे ज्यामुळे इच्छित वस्तूची प्राप्ती होते.

१४) पैशाचा विनाकारण अपव्यय होत असेल, खर्च अधिक बचत कमी होत असेल, अशा वेळी मधाने रुद्राभिषेक करावा.

१५) या जन्मात केलेल्या पापातून मुक्ती हवी असल्यास रुद्र मंत्राचा उच्चार करून तुपाने रुद्राभिषेक करावा.

१६) आरोग्यात सुधारणा होत नसेल तेव्हा उत्तम आरोग्याची प्राप्ती करण्यासाठी गाईच्या दुधाने किंवा तुपाने अथवा दोघांनी रुद्राभिषेक केल्यास लाभ होतो.

१७) जर तुम्हाला बुद्धिमान व्हायचे असेल आणि बुद्धीच्या क्षमतांचा विकास साधायचा असेल तेव्हा दूध किंवा साखर अन्यथा दोघांनी शिवरुद्राभिषेक केल्यास फायदा होतो.

१८) उद्योग व्यवासायाच्या ठिकाणी कर्जबाजारीपणा असेल, सातत्याने आर्थिक नुकसानच होत असेल, अशा वेळी रुद्र मंत्रांनी रुद्राभिषेक केल्यास त्वरित लाभ होतो. 

१९) ज्या व्यक्तीला क्षय रोगाची बाधा झाली असेल अशा व्यक्तीने मधाने रुद्राभिषेक केला पाहिजे.

२०) विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास विस्मरण होत असेल, शिक्षण घेण्यात अडचणी येत असतील तेव्हा सोमवारी रुद्राभिषेक केल्यास लाभ होतो.

Available Panditji

View All

© 2026 Purohit Sangh. All Rights Reserved. Privacy Policy. Website by AIGS